लक्षवेधी ! 2 महाविद्यालयीन मित्र निवडणुकीच्या रिंगणात ‘आमने-सामने’

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीमध्ये बहिण-भाऊ, दोन चांगले मित्र निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरोधात लढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यापैकी परळी आणि जालना या दोन विधानसभा मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. परळी मध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या हायहोल्टेज लढत होत आहे. तर जालना विधानसभा मतदारसंघामध्ये अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. ही निवडणूक दोघांनी प्रतिष्ठेची केली आहे.

महाविद्यालयीन निवडणुकांपासून खोतकर आणि गोरंट्याल हे एकमेकांसमोर आले आहेत. नगर परिषदेच्या राजकारणातून गोरंट्याल सक्रीय झाले तर तरुण वयात खोतकरांची नाळ शिवसेनेशी जुळली. या दोघांमध्ये 1999, 2004 आणि 2009 अशा लढती झाल्या आहेत. या लढतीमध्ये दोन वेळेला गोरंट्याल यांनी बाजी मारली आहे तर चार वेळेस अर्जुन खोतकर यांनी विजय मिळवला आहे.

जालन्याची निवडणूक व्यापार आणि उद्योग यावर अवलंबून आहे. जालन्यातील उद्योजक व व्यापारी तसेच ग्रामीण भाग ज्याच्या पाठीशी आहे तोच उमेदवार विजयी होतो. असा आजपर्यंतचा इतिहास आहे. पालिका ताब्यात असल्याने गोरंट्यांल यांनी निकष डावलून कामे केल्याचा मुद्दा खोतकरांनी प्रतिष्ठेचा केला आहे. जालना मतदारसंघामध्ये अद्यापही नागरी समस्या, शिक्षण, रोजगार हे प्रश्न कायम आहेत.

शिवसेनेत राहूनही तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून राजकारण करणारा नेता म्हणून खोतकर यांची ओळख आहे. तर काँग्रेस पक्ष संकटात असला तरी गोरंट्याल यांनी कधीही निष्ठा सोडली नाही. पालिकेच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय झाल्याने त्यांना शहरातील समस्यांची जाण आहे. तर खोतकर हे कोणत्याही परिस्थितीत हिंमत न हरता समोरच्याशी दोन हात करतात. राजकारण करताना कोणाचेही मन दुखवणार नाही याची काळजी खोतकर घेतात. असे हे दोन महाविद्यालयीन मित्र विधानसभेच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे असून यामध्ये कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या