‘काळजीवाहू’ मुख्यमंत्रिपदावर राहणं हा ‘डावपेच’च ! महाराष्ट्राला गरज नाही, राऊतांचा फडणवीसांवर ‘निशाणा’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रामध्ये सत्तास्थापनेचा तिढा सुटताना दिसून येत नसून शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत. काल भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली मात्र सत्तास्थापनेचा दावा केला नाही. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा टीकेचे बाण सोडले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लागवताना त्यांनी म्हटले आहे कि, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा काही जणांचा डाव आहे, त्यामुळे बहुमत असेल तर त्यांनी सिद्ध करावे, अन्यथा राजीनामा द्यावा. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, सर्वात मोठ्या पक्षाला आधी सरकार बनवण्याची संधी मिळते. त्यामुळे भाजपने बहुमत सिद्ध करावे. तसेच शिवसेनेशिवाय सरकार बनणार नाही, असे भाजप नेते म्हणत असतील तर लोकसभेपूर्वी जे ठरले होते त्यावर अंमल व्हावा, अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच शिवसेना आणि भाजपमध्ये तिसऱ्या कुणी हस्तक्षेप करण्याची गरज नाही असेही यावेळी त्यांनी म्हटले.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास हा राज्यातील जनतेचा अपमान असणार आहे. तसेच हा राज्यावर अन्याय असणार आहे. त्यामुळे आम्हाला पुढे काय करायचे आहे हे माहित आहे. तसेच सर्व आमदारांना एकत्र ठेवण्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले कि, कोणताही निर्णय घेताना सर्व आमदार एका ठिकाणी असावेत, म्हणून आम्ही सर्व आमदारांना एकत्रित ठेवले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात आमदार फोडणे शक्य होणार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आम्ही कधीही कुणापुढे झुकलो नसून शिवाजी महाराजांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत आम्ही स्वाभिमानाने जगलो आहे.

दरम्यान, अयोध्या निकालावर बोलताना राऊत म्हणाले कि, अयोध्येच्या प्रकरणात कुणीही शिवसेनेचे योगदान नाकारू शकत नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल सर्वांना मान्य असेल. त्याचबरोबर अमित शहा यांच्यासमोर सर्व गोष्टी ठरल्या असल्यामुळे ते हस्तक्षेप करत नसल्याचा आरोप देखील यावेळी राऊत यांनी केला.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके