तरच शिवसेना आणि राणेंमधील ‘वाद’ मिटेल, दीपक केसरकर यांचा ‘दावा’

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – नारायण राणे यांनी आज आपला महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष भाजपमध्ये विलीन केला. त्याच बरोबर निलेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, राणे यांच्या भाजप प्रवेशानंतर शिवसेने सिंधुदुर्गचे नेते आणि राज्य सरकारमधील गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मोठे विधान केले आहे. नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी केलेल्या विधानाबाबत जाहीर माफी मागीतल्यास शिवसेना आणि राणे यांच्यातील वाद निश्चितपणे संपतील, असे केसरकर यांनी म्हटले आहे.

नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रीया देताना केसरकर म्हणाले, राणे आता योग्य पक्षात गेले आहेत. त्यामुळे त्यांचे आणि माझे वैरसुद्ध संपेल. मात्र, आता नारायण राणे यांनी संघाची विचारधारा आणि तत्त्वज्ञान आचारमात आणण्याची गरज असल्याचा टोला लागवला. तसेच शिवसेना आणि राणे यांच्यी वाद मिट्याणासाठी राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याबाबत जाहिर माफी मागितली तर वाद निश्चित संपेल असे सांगितले.

नारायण राणे यांचा रखडलेला भाजप प्रवेश आज पार पडला. त्यावेळी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केल्याची घोषणा करत त्यांनी कोकणच्या विकासासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. यावेळी राणे म्हणाले, गेल्या काही काळापासून पक्ष प्रवेशाबाबत विचारणा होत होती. अखेर आज त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. आज माझ्या पक्षासह सर्व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याची घोषणा राणे यांनी केली.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी