‘मतदार यांना 2-2 लाथ मारून बाहेर काढणार, हिंमत होती तर लढायचं होतं ना’ : उदयनराजे

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वडिलांपासून सगळी पदे यांच्या घरात होती. त्यांनी जनतेसाठी काहीच काम केली नाही. मतदार यांना 2-2 लाथा मारुन बाहेर काढणार आहेत. असे विधान भाजप नेते उदयन राजे यांनी केले आहे.

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे हे दोन लाखांच्या मतांनी पराभूत होतील, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली होती. त्यावरून पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करताना उदयन राजे म्हणाले की, ‘पृथ्वीराज चव्हाणांनी काही काम केली नाहीत. मतदार यांना 2-2 लाथा मारुन बाहेर काढणार आहेत. यांच्या वडिलांपासून सगळी पदे यांच्या घरात होती. यांनी जनतेसाठी काहीच काम केली नाही.

सातारा सोडून ज्या शहरात ते राहतात त्या कराडातही विकास केला नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी विकास का केला नाही हा मोठा प्रश्न आहे. विरोधकांना स्वत:च्या घरच्यांचीही मते मिळणार नाही. हिंमत होती तर पृथ्वीराज चव्हाणांनी लढायचं होतं ना, पृथ्वीराज चव्हाण यांना हरणार याची जाणीव होती.’

कलम 370 वर प्रश्न विचारणाऱ्यांनी देशात राहू नये –
कलम 370 विषयी मत व्यक्त करताना उदयन राजे म्हणाले की, ‘देशाचं रक्षण करणारे जवान शहीद होतात. महाराष्ट्राशी संबंध काय विचारता त्यांना लाज वाटायला हवे. शहीदांच्या कुटुंबीयांना जाऊन भेटा, काय वाताहत असे ते समजेल. हे चुकीचं आहे. जे कलम 370 वर प्रश्न विचारताय त्यांनी देशात राहू नये अशाप्रकारे उदयनराजेंनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे.’

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी