‘या’ कारणामुळं राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा दिला, उदयनराजेंनी मोदींच्या सभेत स्वतः सांगितलं

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या तीन महिन्यांत खासदारकीचा राजीनामा दिलेल्या उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. अवघ्या पाच महिन्यामध्ये सातारा लोकसभेची पोटनिवडणूक येत्या 21 ऑक्टोबला होत असून उदयनराजे हे पुन्हा भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यांच्या आणि सातारा जिल्ह्यातील भाजपच्या विधानसभेच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली.

मोंदीच्या भाषणा अगोदर उदयनराजे यांनी केलेल्या आपल्या भाषणात टीकाकारांना आपल्या शैलीत उत्तर दिलं. अवघ्या चार महिन्यांत खासदारकी सोडणं, हा साताऱ्यात चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकांना तो पटला नाही. हे ओळखूनच उदयनराजेंनी आज आपली या निर्णयाची भूमिका स्पष्ट केली. काही जण निवडणुका जवळ आल्या की पक्ष सोडतात. कुणाचं सरकार येणार हे पाहून त्या पक्षात जातात. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने चांगले निर्णय घेतले. त्यांच्या आशीर्वादाने मी जिंकलो त्या मतदारांनाही या सरकारचं काम पटलं.

सातारामधील काहींनी सांगितले की, मोदींसोबत गेला नाहीत, तर आम्ही तुमच्यासोबत राहणार नाही असे सांगितले. त्यानंतर माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून मी राष्ट्रवादी सोडली आणि खासदारकीचाही राजीनामा दिला, असे सांगत त्यांनी आपल्याला पुन्हा विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. कलम 370 चा मुद्दा महाराष्ट्रात कशाला ? असा प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना त्यांनी चपराक लगावली. महाराष्ट्रासाठीच नाही तर देशातील सर्व राज्यांसाठी हा मोठा निर्णय आहे. काँग्रेसच्या काळात हा निर्णय घेतला असता तर आज अनेक जवानांचे प्राण वाचले असते. असे सांगत उदयनराजे यांनी विरोधकांना सुनावले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like