साहेब, माफ करा, यावेळी भाजपला मतदान नाही, आमचं मत राज ठाकरेंच्या मनसेला !!!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आगामी विधानसभा निवडणूक भाजप – सेना युती करून लढणार आहेत. मात्र मुंबईमध्ये काही शिवसैनिक शिवसेनेच्या विरोधात काम करणार असल्याचे दिसून आले आहे. घाटकोपरमधील युतीचे उमेदवार राम कदम यांच्या विरोधात स्थानिक शिवसैनिकांनी आपली नाराजी व्यक्त करत जोरदार पोस्टरबाजी केली आहे.

राम कदम यांना आम्ही मतदान करणार नाही तर मनसेला करणार आहोत असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक शिवसैनिकांनी आमचे मत राज ठाकरेंच्या मनसेला असे स्पष्ट लिहिले आहे.

नेमकं काय म्हणालेत शिवसैनिक पोस्टरमध्ये
किरीट सोमय्याने तुमच्यावर वैयक्तिक आरोप केले होते. आपण त्याला युतीची उमेदवारी मिळू दिली नाही तेव्हा आम्हाला आपला खूप अभिमान वाटला. आणि महिलांचा अपमान करणाऱ्या राम कदमला कोणत्याच पक्षाने उमेदवारी देऊ नका अशी आपली ठाम भूमिका होती. मात्र घाटकोपर मधून राम कदम हे युतीचे उमेदवार आहेत त्यामुळे साहेब माफ करा, यावेळी भाजपाला मतदान नाही आमचं मत राज ठाकरेंच्या मनसेला, आपला घाटकोपरचा कट्टर शिवसैनिक

अशा प्रकारचे पोस्टर शहरभर लावण्यात आलेले आहेत. राम कदम यांनी दहीहंडी उत्सवात केलेल्या तुम्हाला आवडणाऱ्या मुलींच्या आई वडिलांची परवानगी असेल तर आम्ही तीला पळवून आणू असे वादग्रस्त विधान केले होते त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रातून राम कदम यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे आता शिवसैनिकांनी ही नाराजी पोस्टरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

 

Visit : Policenama.com

तुमच्या मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, उपाय जाणून घ्या
जाणून घ्या ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे, अशी घ्या काळजी
चिंच आहे बहुगुणी, उन्हाचा कडाका वाढला तर आवश्य खा

शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
मधुमेहाचे औषध स्तनाच्या कॅन्सरवर उपयुक्त, चिनी संशोधकांचे मत
मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ‘ही’ काळजी, तुमच्यासाठी ठरु शकते फायदेशीर
नाभीवर लावा २ थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत ‘या’ समस्या, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like