शरद पवार यांना राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – येत्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांना राजकारण आणि समाजकारणातून कायमची विश्रांती देणार असल्याचे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. राधानगरी मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते

चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘मला कोथरूडमध्ये अडकून ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या दोन्ही कॉंग्रेसवाल्यांना साधा उमेदवार मिळाला नाही. त्यावरून या पक्षांची ताकद कळते. मी या मतदार संघातून निवडून येणार हे सांगण्यासाठी जोतिष्याची गरज नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांना राजकारण आणि समाजकारणातून कायमची विश्रांती देणार आहे.’

कोल्हापूर जिल्ह्यातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा राधानगरी हा मतदारसंघ आहे. याठिकाणी शिवसेनेचे आमदार प्रकाश अबिटकर यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील यांच्या हॅट्रीक रोखून विजय मिळवला होता.

Visit : Policenama.com