कोण अडून बसलंय हे योग्य वेळी कळेलच, भाजपाच्या ‘या’ बड्या नेत्याचं ‘सूचक’ विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नाही. त्यात शिवसेना आपली आक्रमक भूमिका घेऊन कायम आहे आणि भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे भाजप सेनेच्या मंत्र्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. यावर आज पुन्हा एकदा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. वाघ कुठलाही असो, कुणाचाही असो, त्याचं संरक्षण होणारच असे म्हणत मुनगंटीवार यांनी सत्ता वाटपाबद्दल लवकरच तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त केला.

शिवसेना, भाजपात तणाव वाढला आहे. परंतू ओल्या दुष्काळावर झालेल्या राज्याच्या पालकमंत्र्यांच्या बैठकीला शिवसेना नेते उपस्थित होते. रामदास कदम, एकनाथ शिंदे यांची यावेळी बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा देखील झाली.

बैठक झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवर यांनी पत्रकारांशी या संबंधित संवाद साधला. यावेळी सत्ता स्थापनेपेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. सरकार देखील लवकरच स्थापन होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. वाघ कुठलाही असेल, कुणाचाही असेल, त्याचे संरक्षण होणार. सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच संपेल आणि गोड बातमी मिळेल, अन् कोण अडून बसलयं ते योग्य वेळी कळेल असा टोमणा देखील सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेना हाणला.

काही दिवसांपूर्वी सामनातून होत असलेल्या टीकेवर बोलताना मुनगंटीवार म्हणाले होते की, वाघ अग्रलेख लिहून गुरगुरणार असेल, तर मी ही वनमंत्री आहे. वाघाचे संवर्धन आणि संरक्षण कसे करतात हे मला माहित आहे. शिवसेना भाजपची युती टिकण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न केले. त्यामुळे आता वाघ गुरगुरत असला, तरी त्याला सोबत घ्यायचंच आहे.

Visit : Policenama.com