Maharashtra Election Commission | ‘मतदार नाव नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Election Commission | भारत निवडणूक आयोगामार्फत 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (Brief review program) राबविण्यात आला आहे. त्या माध्यमातून दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या जारी करण्यात येणार आहे. या पार्श्वभुमीवर आता विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी वाढविण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local body elections) आगामी निवडणुकांच्या (Maharashtra Election Commission) अनुषंगाने दिनांक 5 डिसेंबर 2021 पर्यंत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदवता येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान (U.P. S. Madan) यांनी आज दिली.

आगामी निवडणुकांची मोठी आकडेवारी लक्षात घेवून संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. राज्य मुख्य निवडणूक (Maharashtra Election Commission) अधिकाऱ्यांद्वारे मुदतवाढ देण्याबाबत भारत निवडणूक आयोगाकडे (Election Commission of India) मागणी केली होती. या पार्श्वभुमीवर या पुनरीक्षण कार्यक्रमास 5 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे आता पुन्हा 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना 5 डिसेंबर 2021 पर्यंत मतदार यादीत नावे नोंदविण्याची संधी प्राप्त करण्यात आली आहे. (Maharashtra Election Commission)

मतदार नोंदणीसाठी –

राज्य निवडणूक आयोग (Maharashtra Election Commission) आणि गपशप संस्थेने मतदार नोंदणीची सुविधा आणि त्याबाबत संपूर्ण माहिती ‘महाव्होटर चॅटबॉट’या (Mahavoter Chatbot) अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलीय. या पार्श्वभुमीवर http://bit.ly/mahavoter या लिंकवर क्लिक करून अथवा +917669300321 या व्हॉट्सॲप क्रमांकावर hi करून माहिती मिळवू शकणार आहात. अथवा https://mahavoter.in या संकेत स्थळालाही भेट देऊ शकणार आहे.

Web Title : Maharashtra Election Commission | extension till 5th december for voter registration information of state election commissioner

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sitaram Kunte | निवृत्तीनंतर सीताराम कुंटे यांची ‘या’ महत्त्वाच्या पदी नियुक्ती

Maharashtra Rains | पुणे, मुंबई, नाशिकसह कोकणात पाऊस सुरु

IMD | पालघर, ठाणे आणि मुंबईत आज होऊ शकतो मुसळधार पाऊस; जाणून घ्या इतर ठिकाणचा अंदाज

LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या सर्वसामान्यांच्या अपेक्षेला जोरदार झटका ! 100 रुपयांनी महागला कमर्शियल सिलेंडर; जाणून घ्या

Health Test In 30 Sec | ‘या’ 3 सोप्या चाचण्या 30 सेकंदमध्ये सांगतील किती हेल्दी आहात तुम्ही? घरीच करा आरोग्य तपासणी; जाणून घ्या

Sameer Wankhede | समीर वानखेडेंची राज्य सरकारच्या ‘या’ समितीकडून चौकशी

Omicron Variant | भारतात आज मध्यरात्रीपासून प्रवाशांसाठी नवे नियम लागू, जाणून घ्या नवीन नियमावली

Omicron Variant | भारतात केवळ 20% लोकसंख्येला ओमिक्रॉनचा धोका, व्हेरिएंटचे ‘सॉफ्ट टार्गेट’ कोण? जाणून घ्या