विधानसभा २०१९ : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई , कारमधून 8 लाख रुपये जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु असून सर्वच पक्ष आणि उमेदवार साम,दाम,दंड,भेद या सर्वच मार्गांचा वापर करताना दिसत आहेत . अशातच निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाने राज्यातील धारावी विधानसभा मतदार संघातील कारमधून ८.१७ लाख रुपये जप्त केले आहेत. सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान असल्याने निवडणूक आयोगाची तयारी जोरात सुरू आहे आणि अनेक ठिकाणी कडक बंदोबस्तात कारवाई सुरु आहे.

महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी विधानसभा निवडणुका २१ ऑक्टोबरला असून २४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबरला संपत आहे. महाराष्ट्रात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने १२२ जागा जिंकल्या आणि शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या. त्याचवेळी कॉंग्रेसने ४२ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने ४१ जागा जिंकल्या. तर इतर पक्षांनी २० जागा जिंकल्या होत्या. राज्यात १५ वर्षे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडीने सरकार चालवल्यानंतर २०१४ मध्ये स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुका लढल्या होत्या.

दरम्यान, धारावी येथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम जप्त केल्यानंतर यासंदर्भात पुढील तपास सुरु असून योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Visit : Policenama.com