आमच्या पराभूत उमेदवारांची ‘मानसिकता’ सकारात्मक, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झालेल्या भाजप आमदारांची आज एक बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व उमेदवारांना मार्गदर्शन केले. उमेदवारांच्या पराभवाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. निवडणुकीत पराभव झाला असला तरी त्यांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षांनी मिळून एकूण 164 जागा लढवल्या होत्या त्यापैकी 105 जागांवर आम्हाला विजय मिळाला. तर 59 जागांवर पराभव पत्करावा लागला. त्यापैकी काही जागांवर अगदी निसटत्या फरकाने पराभव झाला. आज या पराभूत उमेदवारांची बैठक झाली. तिथे या पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान सर्व पराभूत उमेदवारांची मानसिकता सकारात्मक दिसून आली असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

पराभूत आमदारांच्या या बैठकीत भाजपचेच सरकार राज्यात स्थापन होणार असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच पराभूत उमेदवारांना पक्षसंघटनेत स्थान देणार असल्याचे देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like