‘एवढ्या’ वर्षासाठी असणार शिवसेनेचा मुख्यमंत्री, काँग्रेस-राष्ट्रवादीनं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या संभाव्य आघाडीतही सत्तावाटपात शिवसेनेकडे पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद राहणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद राहील, असे निश्चित झाले आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये जवळपास एकमत झाले असून शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून खलबते सुरू आहेत.

शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाविषयी आक्षेप नाही. संभाव्य कॅबिनेट मंत्र्याबाबत अद्याप चर्चा झाली नाही. तथापि, यावर समन्वय समिती ने चर्चा करण्याचे मान्य केले आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली होती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात किमान समान कार्यक्रमाबाबत एकमत झाले आहे. किमान समान कार्यक्रमामधील करारानुसार शिवसेनेला संपूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपद मिळणार आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेऊन चर्चा करणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like