राज्यातील ‘सत्ता’वाटप अंतिम टप्प्यात, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात अद्यापही सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षात किमान समान कार्यक्रम आणि सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावर एकमत झालेले नाही. अशात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यात नुकत्याच झालेल्या भेटीतून सत्ता स्थापनेची कोंडी फुटेल अशी आशा व्यक्त केली जात होती.

परंतु सत्ता स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असे पवारांनी सांगितल्यानंतर मात्र संभ्रम अधिक वाढला आहे. असे असले तरी महाशिवआघाडीतील सत्तावाटप अंतिम टप्प्यात आहे. इतकेच नाही मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत निश्चित झाले झाहे.

सूत्रांच्या हवाल्याने एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सत्तेसाठी जो नवा फॉर्म्युला ठरला आहे त्यात मुख्यमंत्रीपद 5 वर्षांसाठी शिवसेनेकडे देण्याबाबत आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर एकमत झाले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल. याशिवाय शिवसेनेकडे 15, राष्ट्रवादीकडे 14 तर काँग्रेसकडे 13 मंत्रीपदे असतील असेही निश्चित झाले आहे.

परंतु याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्रीपदाची चर्चा ही केवळ अफवा असल्याचं म्हटलं आहे.

Visit : Policenama.com