‘या’ दिवसापुर्वी राज्यात सरकार स्थापन होईल, अजित पवारांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सत्तास्थापनेच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आज महत्त्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. या बैठकिमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांनी नवनिर्वाचीत आमदारांना मार्गदर्शन केले. काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्र बैठक होऊन चर्चा होणार आहे. आमच्या दोन्ही पक्षामध्ये एकवाक्यता आल्यानंतरच शिवसेनेसोबत चर्चा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी दिली आहे.

या बैठकित आमदारांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी राज्यातील चर्चा लवकरात लवकर संपवण्याचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे नवीन वर्षापूर्वीच राज्यात सरकार येईल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. तसेच महत्त्वाच्या पदांबाबत चर्चा होऊन मार्ग काढला जाईल. या बैठकिमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चर्चा करण्यासाठी समिती तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, सत्तासंघर्षाच्या या घोळामध्ये भाजपने सत्तास्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपला सत्तास्थापन करण्यासाठी लागणारा बहुमताचा 145 च्या आकड्याची जुळवाजुळव करण्यासाठी खासदार नारायण राणेंना इतर आमदार आपल्या गळाला लावावे लागतील. नारायण राणे यांनी काल केलेल्या सत्तास्थापनेच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी राणे यांच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घेयचे हाच प्रश्न असल्याचे म्हटले आहे. सध्या सगळे आमदार पक्षासोबत राहीतील एखादा फुटला तर त्या ठिकाणी निवडणुका लागल्या तर ज्या पक्षाचा आमदार फुटला त्याच पक्षाचा उमेदवार उभा राहील आणि अन्य दोन पक्ष त्याला पाठिंबा देतील. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर कोणता माइकालाल हरवू शकत नाही असे आव्हान राणेंना दिले.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like