‘नेम’ एकाचा तर ‘गेम’ दुसर्‍याचा ! 20 वर्षानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी घडविणार इतिहास ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 2019 ची विधानसभा निवडणूकीत शरद पवार यांच्या केंद्रस्थानी राहिली. निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य राहिलेले शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तास्थापनेच्या घडामोडींमध्ये महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये जवळपास एकमत झाले असून शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अजूनही खलबते सुरू आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या संभाव्य आघाडीतही सत्तावाटपाचा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार असून काँग्रेसला सलग पाच वर्षे उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. 1999 साली काँग्रेसपेक्षा जास्त संख्याबळ असतानाही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिलं होतं. मात्र यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला मुख्यमंत्री होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राजाच्या सध्याच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची वाय. बी. चव्हाण सभागृहात आज सकाळी बैठक घेण्यात आली. या बैठकीत पवार यांनी मध्यावधी निवडणुका होणार नाही सांगत सत्ता स्थापनेबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.

Visit : Policenama.com