शिवसेनेचे नेते बनलेत ‘गजनी’, भाजपच्या ‘या’ नेत्यानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना शिवसेनेकडून वारंवार भाजपवर निशाण साधला जातोय. कधी संजय राऊत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपवर बोलतात तर कधी सामनाच्या अग्रलेखातून भाजपचा समाचार घेतात. मात्र आता भाजपनेही याला जशाच तसे उत्तर द्यायला सुरुवात केली आहे.

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते जीवीएल नरसिम्हा राव यांनी आम्ही सामना वाचत नाही, जे त्यात लिखाण करतात तेच सामना वाचतात, ज्यांना बाहेर जायचं होतं ते स्वत: बाहेर गेले आहेत असा टोला शिवसेनेला लगावला आहे. आम्ही आहे त्याच ठिकाणी आहोत असे सांगत शिवसेनेचे प्रवक्ते सध्या गजनी झाले आहेत कारण ते दोन दिवसापूर्वी एक बोलतात, आज एक बोलतात अशा शब्दात राव यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच आम्ही जनतेला चांगल्या सरकारच वचन दिल होत मात्र शिवसेनेने विश्वासघात केला असल्याचे मत भाजपकडून व्यक्त केले जात आहे.

शिवसेनेला एनडीएमधून बाहेर काढण्यात आलं आणि लोकसभेत व राज्यसभेत शिवसेना स्वतंत्र बाकावर बसल्याचे पहायला मिळाले. मात्र सामनाच्या अग्रलेखातून भाजपलाच शिवसेनेकडून विचारण्यात आले आहे की, तुम्ही आम्हाला एनडीएतून बाहेर काढणारे कोण ? तसेच छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राशी घेतलेला पंगा महाराष्ट्र उखडून टाकणार अशा तिखट शब्दात सामनातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीच्या दिवशीच शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याचा निर्णय करण्यात आला मात्र शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा मंबाजीला कधीच साथ देणार नाही, तुमचा बांबू उखडून टाकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशा शब्दात सामनातून भाजपवर जोरदार पद्धतीने टीका करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like