शिवसेनेची ‘चिंता’ आणखी वाढली, काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याने केलं ‘हे’ वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढत चालली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी सत्ता स्थापने बाबात अद्याप काहीही ठरले नसल्याचे सांगितले. अजित पवार यांच्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेची धाकधूक आणखीनच वाढली आहे. सत्तास्थापनेबाबत आमचं अजून ठरलं नाही असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर किमान समान कार्य़क्रम हे सूत्र घेऊन राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना सरकार चालविण्यासाठी एकत्र येणार असे चित्र निर्माण झाले. मात्र, प्रत्यक्षात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठीच्या बैठकीतच हा अंतिम निर्णय अवलंबून आहे. दरम्यान, शिवसेनेकडून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे वारंवार सांगत असले तरी दोन्ही काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे हे शक्य नाही.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी निकालानंतर वारंवार सांगितले की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. त्यातच शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसकडे सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांना एकत्र आणून सरकार बनविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उद्या याबाबत काँग्रेसच्या नेत्यांची आणि शिवसेना नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यात नवीन समीकरणे उदयास येणार की नाही हे ठरणार आहे असे सांगितले. त्यामुळे अद्यापही राज्यातील सत्तास्थापनेवर अंतिम निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Visit : Policenama.com