मुख्यमंत्रिपदावरून आमच्यात वाद होणार नाही, शिवसेनेचा सन्मान राखला जाईल, ‘या’ बडया नेत्यानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत सत्तास्थापनेबाबत अनेक खलबत सुरु आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आज असलेली बैठक रद्द झाल्यानंतर उद्या ही बैठक घेतली जाणार आहे. यावेळी समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर चर्चा होईल असे सांगितले जात आहे. राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवायची असेल तर तीनही पक्षांनी एकत्र आल्याशिवाय पर्याय नसल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री पदाबाबत आमच्यात भांडण होणार नाहीत आणि शिवसेनेचा सन्मान ठेवणे ही आमची जबाबदारी असल्याचे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. महाशिवआघाडी या नावावर आक्षेप घेत मलिक म्हणाले मीडियाने केलेले हे नामकरण चुकीचे आहे कारण या आधी जितक्या आघाड्या झाल्या त्यामध्ये कोणत्याही एका पक्षाचे नाव आलेले नाही.

तसेच जो काही निर्णय होईल तो वरिष्ठांच्या अनुमतीने होईल तसेच यामध्ये मित्र पक्षांना देखील विचारात घेतले जाणार असल्यामुळे थोडा वेळ लागणार आहे. जो काही निर्णय होईल तो राज्याच्या हिताचा असेल. भाजपला कशापद्धतीने सत्तेपासून दूर ठेवता येईल यावर सर्वानुमते विचार करून ठरवले जाईल असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे. शरद पवार हे एका पत्रकार परिषदेदरम्यान असे म्हणाले होते की, शिवसेनेनं १७० चा आकडा कोठून आणलाय याबाबत त्यांनाच विचार. राज्यपालांनी आम्हाला सहा महिन्यांची मुदत दिलेली आहे आणि आम्ही त्याच्यावर लक्ष ठेऊन आहोत असं देखील पवार यावेळी म्हणाले होते.

Visit : Policenama.com