उध्दव ठाकरे आणि अहमद पटेल यांच्यात ‘ठरलं’, ‘हा’ अंतिम फॉर्म्युला ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेनेशी कसे जुळवून घ्यायचे, याबाबत सध्या वाटाघाटी सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी शिवसेना पक्षप्रमुख यांची भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीत सरकारस्थापनेचा फॉर्म्युला तसेच त्याच्या अटीशर्तींवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक झाली. तसेच या बैठकीत सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली. तसेच अहमद पटेल यांनी काँग्रेसची संस्कृती आणि सरकार स्थापनेतील अटीशर्तींची माहिती उद्धव ठाकरे यांना दिली. त्यांनतर बैठकीबाबतचा अहवाल सोनिया गांधी यांना देण्यासाठी पटेल दिल्लीला रवाना झाले.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये जवळपास एकमत झाले असून शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अजूनही खलबते सुरू आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या संभाव्य आघाडीतही सत्तावाटपाचा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार असून काँग्रेसला सलग पाच वर्षे उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे.

Visit : Policenama.com