मावळमधून विद्यमान आमदार बाळा भेगडे पराभवाच्या छायेत, 50 हजार मतांनी पिछाडीवर

पुणे/मावळ : पोलीसनामा ऑनलाइन – मावळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील शेळके यांनी आघाडी घेतली आहे. शेळके यांनी 50 हजार मतांची आघाडी घेतली असून  विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे. बाळा भेगडे यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. सुनील शेळके यांच्यासोबत झालेल्या अटतटीची लढतीमध्ये शेळके यांनी बाळा भेगडे यांना हॅटट्रीक साधण्याची संधी न देता भाजपच्या बालेकिल्ल्यात शेळके यांनी मुसंडी मारली  होत आहे.

या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.  प्रतिष्ठेचा झालेल्या आणि भजपचा बालेकिल्ला असलेल्या मावळ मतदारसंघात चुरशीची लढाई होत आहे. विद्यमान आमदार, राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन हॅट्ट्रिक साधण्याची संधी दिली आहे. तर उमेदवारी डावल्याने नाराज झालेल्या सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेत उमेदवारी पदरात पाडून घेतली. त्यामुळे मावळ मध्ये निष्ठावंत विरुद्ध बंडखोर अशी लढत होत असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.

भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या सुनील शेळके यांचा पत्ता कट करून भेगडे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. हेच टायमिंग साधत राष्ट्रवादीने शेळके यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देऊन भेगडे यांना तगडे आव्हान दिले. शेळके हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आहेत. नगरपरिषदेच्या माध्यमातून केलेल्या विकास कामामुळे त्यांचा  विजय निश्चित असल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत

Visit : Policenama.com