जुन्नर मतदारसंघात चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतुल बेनके विजयी

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाईन – जुन्नर विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांनी 9068 मतांनी विजय मिळवला आहे. शरद पवार यांनी घेतलेली सभा, खासदार अमोल कोल्हेचा जनसंपर्क,  शिवसेनेच्या मतविभाजनाचा बेनके यांना फायदा झाला. अतुल बेनके यांनी सेनेचे उमेदवार व विद्यमान आमदार शरद सोनवणे यांना 9 हजार 68 मतांनी पराभूत केले. सोनवणे यांना  65 हजार 890 मते मिळाली तर तिसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार आशा बुचके यांना  50 हजार  50 मिळाली.

शरद सोनवणेंनी या निवडणुकीला पुन्हा घरवापसी केली आहे. हे आशा बुचकेंना हे सहन न झाल्याने त्यांनी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र  आशा बुचके यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. 2009 च्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वल्लभ बेनके यांना जुन्नरच्या मतदारांनी पसंती दिली होती.

सुरुवातीपासूनच  या मतदार संघावर आघाडीची पकड होती. मात्र 2014 च्या विधानसभेत मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारत  शरद सोनवणेंच्या रूपाने मनसेचा राज्यातला एकमेव आमदार निवडून दिला होता.

1 अतुल वल्लभ बेनके (काँग्रेस)                                74958 (विजयी उमेदवार)
2 शरददादा भिमाजी सोनवणे (शिवसेना)                   65890
3 आशा दत्तात्रय बुचके  (अपक्ष )                               50041
4 अशोक शंकर बाळसराफ (वंचित बहुजन अघाडी)   873
5 आल्हाट राजेंद्र लक्ष्मण (अपक्ष )                             280
6 आशा गंगाराम तोतरे (अपक्ष )                               397
7 साहेबराव दत्तात्रय शिंदे (बहुजन समाज पार्टी)        766
8 डॉ. केदारी विनोद तान्हाजी (अपक्ष )                      6719
9 राजेंद्र उर्फ राजाराम भागुजी ढोमसे (अपक्ष )          222
10 रोहिदास पिलाजी देठे (अपक्ष )                           363
11 सुखदेव गणपत खरात (अपक्ष )                          528
12 NOTA                                                            1492

Visit : Policenama.com