अजित पवारांची विजयी आघाडी

बारामती :  पोलीसनामा ऑनलाइन – बारामतीमधून अजित पवारांनी विजयी आघाडी घेतली आहे. अजित पवारांनी जवळ जवळ पन्नास हजाराहून अधिक मोठी आघाडी घेतली आहे. अजित पवारांविरोधात भाजपने आयात केलेले गोपीचंद पडळकर हे बारामतीतून विधानसभेच्या रिंगणात आहेत.

पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघ पवार कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. १९६७ पासून पवार कुटुंबातील व्यक्तीनेच विधानसभेत बारामतीचे प्रतिनिधीत्व केले आहे. १९६७ ते १९९० शरद पवार आणि त्यानंतर अजित पवार सातत्याने या मतदारसंघातून निवडून येत आहेत. मागच्या ५० वर्षात बारामतीमध्ये कुठलाही पक्ष पवार कुटुंबासमोर आव्हान उभा करु शकलेला नाही.

अजित पवार यांच्यावर विविध आरोप होत असले तरी २०१४ सालच्या विजयाच्या मताधिक्क्यामध्ये फरक पडणार नाही असा त्यांना विश्वास आहे. अजित पवार यांना २००९ साली १,२८,५४४ तर २०१४ साली १ लाख ५० हजार ५८८ मते मिळाली. मोदी लाटेतही अजित पवार यांच्या मताधिक्क्यामध्ये २२ हजारांची वाढ झाली.

 

टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत

Visit : Policenama.com