लातूरमध्ये देशमुख बंधू आघाडीवर

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – लातूर ग्रामीण आणि लातूर शहर या दोन्ही मतदारसंघातून देशमुख बंधू आघाडीवर असून या ठिकाणी युतीचे उमेदवार पिछाडीवर आहेत. धीरज देशमुख आणि अमित देशमुख हे दोन्ही बंधू या ठिकाणी आघाडीवर असून लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख निवडणूक लढवत आहेत तर लातूर शहरामध्ये अमित देशमुख निवडणूक लढवत आहेत.

धीरज देशमुख यांच्याविरोधात शिवसेनेचे सचिन देशमुख निवडणूक लढवत असून अमित देशमुख यांच्याविरोधात भाजपचे शैलेश लाहोटी पिछाडीवर आहेत. या दोन्ही मतदारसंघातील युतीचे उमेदवार पिछाडीवर असून यामुळे युतीसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत

 

Visit : Policenama.com 

You might also like