नालासोपारामध्ये शिवसेनेचे उमेदवार माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा पिछाडीवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नालासोपारामधून शिवसेनेचे प्रदीप शर्मा पिछाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे प्रदीप शर्मा हे पिछाडीवर असून त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर हे याठिकाणी आघाडीवर असून पहिल्या तीन फेऱ्यांमधील मतमोजणीनंतर हि आकडेवारी समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रदीप शर्मा यांनी या निवडणुकीत चांगलाच जोर लावला होता. त्याचबरोबर या मतदारसंघातून दोन वेळा निवडून गेलेल्या क्षितीज ठाकूर यांनी देखील याठिकाणी जोर लावला असून पुढील फेऱ्यांमध्ये काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत

 

Visit : Policenama.com