‘वाघा’च्या गळयात राष्ट्रवादीचं ‘घडयाळ’ अन् ‘पंजा’त ‘कमळ’, काय सांगतं हे कार्टून जे संजय राऊतांनी केलं शेअर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीमध्ये शिवसेना आणि भाजपच्या सरकारने आपले बहुमत कायम राखले असून मागील वेळेपेक्षा जागा मात्र कमी झालेल्या आहेत. त्यानंतर आता ’50-50’ फॉर्म्युल्यावर विचारमंथन सुरु झाले असून आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक कार्टून शेअर केले आहे. यामध्ये वाघाच्या हातात कमळ दिसून येत आहे. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये वाघाच्या गळ्यात एक घड्याळ दिसून येत असून राऊत यांनी ट्विटरवर हे शेअर केले आहे. त्याखाली लिहिले कि, उत्तम व्यंग असणारे चित्र, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

काय आहे कार्टूनमध्ये –

शिवसेनेचे उपचिन्ह हे वाघ असून घड्याळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निशाण आहे. आणि कमळ हे भाजपचे निशाण आहे. या कार्टूनमध्ये दाखवण्यात आले आहे कि, शिवसेनेकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा सपोर्ट असून जर भाजपबरोबर त्यांचे जमले नाही तर त्यांच्याकडे राष्ट्रवादी देखील पर्याय असल्याचे यातून दिसून येत आहे.

हे शक्य आहे –

महाराष्ट्रात बहुमतासाठी 145 जागांची आवश्यकता असून सध्या शिवसेना आणि भाजपकडे बहुमत आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने अनेक गणिते बदलू शकता, खाली आपण हे पाहू शकतो.

हि आहे संभावना –

बहुमतासाठी 145

शिवसेना +भाजप : 105+56= 161

शिवसेना + राष्ट्रवादी : 56+54= 110

भाजप + राष्ट्रवादी : 105+54= 159

कांग्रेस + राष्ट्रवादी : 44+54= 98

कांग्रेस + राष्ट्रवादी + शिवसेना : 44+54+56 = 154

Visit : Policenama.com