ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना ‘कोरोना’ची लागण !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांनी स्वत: ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. इतकंच नाही तर त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही त्यांनी कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. याआधीही राज्य सरकारमधील 5 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर आता ऊर्जामंत्री राऊत यांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

नितीन राऊत यांनी ट्विट करत लिहिलं की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मागील काही दिवसांपासून जे नागरिक माझ्या संपर्कात आहेत त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी.” असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

राज्यात यापूर्वी जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, विश्वजित कदम, शंकरराव गडाख यांच्यासह अन्य काहींना कोरोनाची लागण झाली होती.

भारतात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. या ठिकाणी बाधितांचा आकडा हा 10 लाखांच्या पुढे गेला आहे. त्यात 3 लाख ॲक्टीव्ह कोरोना रुग्ण आहेत. तर 30 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like