Exit Poll : ‘या’ लहान पक्ष्यांनी दाखवला मोठा ‘दम’, बिघडला काँग्रेस-राष्ट्रवादीचा ‘गेम’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात मागील की महिन्यापासून सुरु असलेला मतदानाचा धुरळा संपला असून अखेर काल राज्यात मतदान पार पडले. त्यानंतर विविह संस्थांच्या सर्वेनुसार राज्यात पुन्हा एकदा युतीचे सरकार येत असून आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या सर्व्हेमध्ये प्राक्सग आंबेडकर यांच्या वंचित बहुजनबहुजन आघाडी आणि ओवेसींच्या एमआयएमला जवळपास 22 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या छोट्या पक्षांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे गणित बिघडवल्याचे दिसून येत आहे.

काल संध्याकाळी मतदान पार पडल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली. यामध्ये शिवसेना आणि भाजप महायुतीला 166-194 जागा दाखवत असून शिवसेनेला 57 ते 70 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर भाजपला 109 ते 124 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला यामध्ये 72 ते 90 जागा दाखवत असून यामध्ये काँग्रेसला 32 ते 40 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 40 ते 50 जागा मिळतील असे दाखवण्यात येत आहे. तर अन्य छोट्या पक्षांना 22 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीत 1 डझन जागांवर आघाडीला फटका
2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी हे दोघे एकत्र मैदानात उतरले होते. त्यावेळी एमआयएमने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात विजय देखील मिळवला होता. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीच्या 12 उमेदवारांना याचा फटका बसला होता. जवळपास 14 टक्के मतदान घेत वंचितने आघाडीला मोठा झटका दिला होता. जवळपास 6 जागांवर त्यांच्या उमेदवारांनी दीड लाखाच्या पुढे मतं मिळवली होती. त्याचबरोबर सुशील कुमार शिंदे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पराभवात देखील वंचितच्या उमेदवारांनी मोलाची भूमिका बजावली होती.

विधानसभा निवडणुकीत कोण कुठे लढले
या विधानसभा निवडणुकीत वंचितने 274 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 101 जागांवर तर भाकपाने 16, माकपाने 8 आणि बसपाने 262 जागांवर उमेदवार उभे केले होते. सर्वात जास्त जागा या भाजपने लढवल्या असून त्यांनी 164 तर शिवसेनेने 124 जागांवर उमेदवार उभे केले होते. कांग्रेसने 147 तर राष्ट्रवादीने 121 जागांवर उमेदवार उभे केले होते.

Visit : Policenama.com