आमचे अच्छे दिन आले अंधारात : सुप्रिया सुळे 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन 

आॅक्टोबर हिटमुळे वाढलेली विजेची मागणी, कोळशाचा तुटवडा आणि पाण्याची पातळी खालावल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पावर आलेली बंधने यामुळे वीजनिर्मिती आणि मागणीमध्ये पाच हजार मेगावॅटचा फरक पडला आहे. कोळशाचा तुटवडा जाणवत असल्याने भारनियमनाचा प्रश्न इथूनपुढे आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.  भारनियमनाचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट अंधारात व्हिडीओ शूट करुन फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’35232031-cc59-11e8-a4c8-eb8e2091a90d’]

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला आघाडीने देशभरात संविधान बचाओ, देश बचाओ ही मोहीम हाती घेतली असून त्यासाठी सुप्रिया सुळे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान औरंगाबादमध्ये त्या कदम कुटुंबीयांकडे चहा घेण्यास गेल्या होत्या.  सुप्रिया सुळे कदम कुटुंबीयांकडे गेल्या असताना, तिथे लाईट नव्हती. त्यामुळे त्यांनी मोबाईलवर अंधारातच शुटिंग करुन, औरंगाबादमधील भारनियमनाची स्थिती सांगितली.औरंगाबादकरांना सध्या भारनियमनाचा  सर्वाधिक सामना करावा लागत आहे.
“दिवसभर लाईट नाही, लोडशेडिंग सुरु आहे. सर्वत्र अंधार आहे, औरंगाबाद अंधारात आहे.  मुख्यमंत्री साहेब काही तरी करा. खरंच आमचे अच्छे दिन आले  अंधारात” , असं म्हणत सुप्रिया सुळेंनी व्हिडीओद्वारे सरकारवर निशाणा साधला.

कोल्हापुर : यड्राव फाटया जवळून 2 पिस्तुले, 12 काडतुसे जप्‍त

का होत आहे भारनियमन –

तापमान वाढल्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. दूसरीकडे कोळश्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे विद्युतनिर्मितीवर परिणाम झालाय. त्यामुळे राज्यात आजपासून अनेक भागात भारनियमनाला  सुरुवात झाली आहे.
कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातले २१००  मेगावॅट विजनिर्मिती संच बंद पडले आहेत. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात तूट निर्माण झाली आहे.  त्यामुळे सध्या जी १,२, ३  या गटात भारनियम सुरु झालंय.सेंट्रल ग्रीडमध्ये वीज महाग झाली आहे. इतर राज्यांनी अधिकच्या किंमतीने वीज विकत घेतली आहे,त्यामुळे वीज उपलब्ध नाही.

प्रशिक्षणार्थ ४३ पोलीस उपनिरीक्षक पिंपरी चिंचवड आयुक्तालयात हजर

यामध्ये प्रामुख्याने विद्युत गळती होत असलेला विभागाचा समावेश आहे. ७०० ते ८००  मेगावॅटचा तुटवडा सध्या आहे, तूट वाढल्यास राज्यात इतर भागातही टप्याटप्यात लोडशेडिंग सुरू करावं लागणार आहे.

[amazon_link asins=’B01L56DSKG,B00UTEG7I6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7caa04cf-cc5a-11e8-9c81-0f5e4184a2c3′]