Maharashtra Farmers March | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची शेतकरी शिष्टमंडळासमवेत बैठक; लाँगमार्च आंदोलन थांबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Farmers March | राज्यातील शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून आज शेतकरी लाँग मार्चच्या शिष्टमंडळाबरोबर सर्व मुद्दांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. यासंदर्भात विधीमंडळाच्या सभागृहात निवदनाद्वारे माहिती देण्यात येईल. लाँगमार्च आंदोलन थांबविण्यात यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज येथे केले. (Maharashtra Farmers March)

नाशिकहून शेतकऱ्यांचा लाँगमार्च निघाला असून माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी शिष्टमंडळाने आज विधानभवनात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil), कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar), आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijaykumar Gavit), ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), बंदरे व खनीकर्म मंत्री दादा भुसे (Dadaji Bhuse), सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save), मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, शेतकरी शिष्टमंडळातील डॉ. अशोक ढवळे, विनोद निकोले, इंद्रजीत गावित, अजित नवले, उमेश देशमुख, डी. एल. कराड यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. (Maharashtra Farmers March)

सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत परंपरागत पद्धतीने आदिवासी कसत असलेल्या जमिनी, वनहक्क दावे, कांद्याचा प्रश्न, वनांमधील अतिक्रमणे, गायरान जमिनी, शेतकऱ्यांना बारा तास वीज, शेती विषयक कर्ज आदी विविध मुद्यांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी माजी आमदार श्री. गावीत यांनी विविध मागण्या मांडल्या. त्यावर राज्य शासनाने दाखविलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल गावीत यांनी आभार व्यक्त केले.

राज्य शासन शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांवर सकारात्मक असून त्याबाबत घेतलेल्या
निर्णयांबाबत विधीमंडळाच्या सभागृहात निवेदन करून माहिती दिली जाईल,
असे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला लाँगमार्च थांबविण्याचे आवाहन केले.

Web Title : Maharashtra Farmers March | Meeting of Chief Minister,
Deputy Chief Minister with Farmers Delegation; Appeal of Chief Minister Eknath Shinde to stop the long march movement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amruta Fadnavis Bribery Case | ‘देवेंद्र फडणवीस स्वत: गृहमंत्री, चौकशी करुन सत्य जनतेसमोर आणा’ – नाना पटोले

MLA Sunil Tingre | पुणे महापालिकेत समाविष्ट गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ! आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Pune PMC To FDA Administration | एफडीए ने अन्न परवाना नूतनीकरणावेळी व्यावसायीकांना पाणी पुरवठा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) बंधनकारक करावे; महापालिका आयुक्तांचे FDA प्रशासनाला पत्र