Pune News : सीरम इन्स्टीट्यूटमध्ये आग, अदर पूनावाला म्हणाले – ‘सध्या लोकांना बाहेर काढण्यावर फोकस’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  महाराष्ट्रातील पुण्यामध्ये सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या नव्या प्लँटमध्ये आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्नीशमन दलाच्या 15 गाड्या आग विझवण्याचे काम करत आहेत. सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच कोरोना व्हॅक्सीन कोविशिल्ड बनवत आहे, ज्याचा पुरवठा भारतासह अनेक देशांमध्ये केला जात आहे.

ही आग पुण्यातील मांजरीमध्ये सीरम इन्स्टीट्यूटच्या नव्या प्लँटमध्ये लागली आहे. मागच्या वर्षीच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी या प्लँटचे उद्घाटन केले होते, परंतु सध्या या प्लँटमध्ये व्हॅक्सीनचे उत्पादन सुरू करण्यात आलेले नाही.

फायर ऑफिसरनुसार, प्लँटमध्ये चार लोक अडकले होते, तीन लोकांना वाचवण्यात यश आले आहे. सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी म्हटले की, अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यावर सध्या आमचा फोकस आहे.

पुण्याचे पोलीस कमिश्नर म्हणाले, आग मांजरी येथील प्लँटमध्ये लागली आहे. व्हॅक्सीनचे उत्पादन तिथे सुरू झालेले नव्हते. परंतु नंतर उत्पादन सुरू करण्याची तयारी सुरू होती. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्लँट रिकामा करण्यात आला आहे.

जुन्या प्लँटमध्ये होत आहे व्हॅक्सीन प्रॉडक्शन

सध्या कोरोना व्हॅक्सीन कोविशिल्डचे प्रॉडक्शन सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या नव्या प्लँटपासून सुमारे एक ते दोन किलोमीटरवर असलेल्या जुन्या प्लँटमध्ये केले जात आहे. या प्लँटची निर्मिती 1996 मध्ये करण्यात आली होती. येथे कोविशिल्ड व्हॅक्सीनचे प्रॉडक्शन सुरू ओह. कोविशिल्डचे मोठ्या प्रमाणात प्रॉडक्शन करण्याची तयारी नव्या प्लँटमधून होती, ज्याच्या काही भागात आग लागली आहे.

नव्या प्लँटमध्ये लावली जात आहे मशीनरी

सूत्रांनुसार, मांजरीच्या या प्लँटमध्ये कोविशिल्डच्या प्रॉडक्शनसाठी मशीनरी लावण्याचे काम सुरू होते. या नव्या प्लँटच्या टर्मिनल 1 मध्ये सीईओ अदर पूनावाला यांनी आपले कॉर्पोरेट ऑफिस बनवले आहे. आग टर्मिनल 1 मध्ये लागली आहे, जिच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या सीरम इन्स्टीट्यूटकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

जीवीतहानी झालेली नाही

सीरम इन्स्टीट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी म्हटले, चिंता आणि प्रार्थनेसाठी सर्वांना धन्यवाद. आतापर्यंतची सर्वात महत्वपूर्ण बाब ही आहे की, आगीत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही, किंवा कुणी जखमी झालेले नाही. मात्र, काही फ्लोअरचे अतोनात नुकसान झाले आहे.

सरकारने दिले चौकशीचे आदेश

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी म्हटले की, आम्ही चौकशीचे आदेश दिली आहेत. मी प्रशासनासोबत सतत संपर्कात आहे. देश आणि जगभरात या घटनेने चिंता व्यक्त केली जात आहे. अजीत पवार म्हणाले, मी हे स्पष्ट करतो की, व्हॅक्सीन निर्मितीचा प्लँट सुरक्षित आहे.