Maharashtra Flood | पूरग्रस्त भागात मृत्यूतांडव ! 164 जणांचा मृत्यू, 25 हजार 564 जनावरं दगावली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Flood | कोरोनाची दुसरी लाट ओसरली देखील नाही तोवर आभाळ कोसळल्यासारखं तिसरंच संकट कोसळलं आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाने अतिशय जोर (Heavy rain) धरला आहे. अनेक जिल्ह्यात पावसाने जलप्रलय (Maharashtra Flood) झाला आहे. कोकण (Konkan), कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli), सातारा (Satara) आणि रायगडमध्ये (Raigad) अतिमुसळधार पावसाने हाहाकार माजला आहे. अनेक ठिकाणी तर दरडी कोसळल्या आहे. या दुर्घटनेत अनेकांचा संसार निकामी झाला आहे. पूरग्रस्त ठिकाणी आतापर्यंत 164 जणांचा प्राण गेला आहे.

Maharashtra Flood | deaths in konkan sangli kolhapur flood and landslide official data cm uddhav thackeray visit

या नैसर्गिक संकटामुळे लोकं हैराण झाली आहेत. पाण्याच्या प्रवाहाने संसार देखील वाहत जात आहे. तर या अस्मानी संकटाच्या प्रकोपात तब्बल 25 हजार 564 जनावरं दगावली आहे. दरम्यान, मदत व पुनर्वसन विभागाने (Relief and Rehabilitation Department) आज (26 जुलै) रात्री 11 वाजेपर्यंतची माहिती प्रसिद्ध केलीय. विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनेतून सुमारे 2 लाख 29 हजार 74 जणांना सुखरूपपणे बाहेर काढलं आहे. आतापर्यंत एकूण 164 जण दगावले असून 56 जण जखमी आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या शंभर जणांचा NRDF च्या जवानांकडून तपास केला जातोय. तर अनेकांचे मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

या दरम्यान, सांगली,(Sangli) कोल्हापूर,(Kolhapur) रायगड,(Raigad) रत्नागिरी (Ratnagiri) आणि कोकणातील (konkan ) काही इतर ठिकाणी झालेल्या जोरदार पावसाने (Heavy rain) एकूण 1028 गावं बाधित झाली आहेत. पुरामुळे (Flood) स्थलांतरित केलेल्या लोकांसाठी प्रशासनाकडून 259 घरे उभारण्यात आलीत. तर या निवारा केंद्रात सध्या 7832 लोकं निवारा घेताहेत. परंतु, संबंधित नागरिकांच्या शेतीचं, घराचं आणि व्यवसायाचं प्रचंड नुकसान झालाय. सध्या अनेक स्वयंसेवी संस्था गरजू नागरिकांच्या मदतीचा पुढे सरसावल्या आहेत.

पुरस्थितीबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले?

गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) देखील
पूरग्रस्त ठिकाणाची पाहणी दौरा करत आहेत. लवकरच मोठी मदत जाहीर करण्याचं आश्वासन
मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलं आहे. फक्त लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा
करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई बाबत मदत
जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

हे देखील वाचा

Sangli News | इस्लामपुरातील राजारामबापू कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील यांचे अपघाती निधन

Konkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वेत सिव्हिल इंजिनीअर्ससाठी मोठी भरती; आजच करा अर्ज

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Maharashtra Flood | deaths in konkan sangli kolhapur flood and landslide official data cm uddhav thackeray visit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update