पुरग्रस्तांसाठी बिग बींकडून 51 लाख तर अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीकडून 5 कोटींची मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूर, सांगलीकरांची पुरामुळे मोठी हानी झाली आहे. लाखो लोकांचे संसार पाण्याखाली गेले. हजारो लोक बेघर झाले आहेत. पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्तांसाठी रिलायन्स इंडस्ट्रिज आणि बिग बी अमिताभ बच्चन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत जमा केली आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देत त्यांचे आभार मानले आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रिजने ५ कोटी रुपयांची तर अमिताभ बच्चन यांनी ५१ लाखांची मदत पूरग्रस्तांना केली आहे. याविषयी ट्विट करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत की , ‘अमिताभ बच्चन यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये ५१ लाख रुपये जमा केले आहेत. ही रक्कम सांगली, कोल्हापूर, सातारा याठिकाणी पूरग्रस्त भागातील मदत आणि योगदानासाठी अनेकांना प्रेरणादायी ठरेल. ‘

पश्चिम महाराष्ट्रात महापुराने हाहाकार उडवला. पुरामुळे सर्वसामान्य माणूस, शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकही उद्ध्वस्त झाला आहे. महापुरामुळे वीज, पाणीपुरवठा, संपर्क यंत्रणांसह रस्त्यांचीही मोठी हानी झाली. आतापर्यंत ६० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पुरामुळे घडलेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना ५ लाखांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like