उद्धव सरकारला भाऊ राज ठाकरेंच्या आमदाराचे मत नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं बहुमताच्या परीक्षेचा निर्णायक अडथळा आज यशस्वीरित्या पार केला. नवे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सरकारवरील विश्वास ठराव सहज जिंकला. उद्धव ठाकरे सरकारनं 169 विरुद्ध 0 मतांनी जिंकला. तर चार आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली.

महाराष्ट्र विधानसभेत आज उद्धव ठाकरे यांनी फ्लोर टेस्ट पास केली. उद्धव ठाकरे यांच्या बाजून 169 आमदारांनी मतदान केले. तर चारजणांनी तटस्थ भूमिका घेतली. तटस्थ भूमिका म्हणजे कोणत्याही पक्षाला मतदान न करणे. तटस्थ आमदारांमध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांचा समावेश आहे. फ्लोर टेस्टच्या आगोदर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सभात्याग केला.

विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिबा दिलेल्या अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांनी निकालानंतर भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, आज महाविकास आघाडीच्या फ्लोर टेस्टमध्ये संजय शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांच्या बाजून मतदान केले. संजय शिंदे हे करमाळा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

विरोधी पक्ष नेता दर्जेदार असावा अशी आमची अपेक्षा : जयंत पाटील
विश्वासदर्शक ठरावापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल करणारे मुद्दे मांडले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे आम्हाला दर्जेदार विरोधी पक्ष नेता असावा असे यावाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. आपले जे दैवत आहे त्यांचे नाव जर मंत्र्यांनी शपथ घेण्यापूर्वी घेतले तर काय बिघडलं, असे ही ते यावेळी म्हणाले.

Visit : Policenama.com