Maharashtra Gang Rape Case | महाराष्ट्रातील ‘त्या’ सामुहिक बलात्कार प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्यासह 2 कर्मचारी निलंबित

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Gang Rape Case | भंडारा सामुहिक बलात्कार प्रकरणी (Bhandara Gang Rape Case) भंडारा पोलिसांनी (Bhandara Police) मोठी कारवाई केली आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्यावर (Police Officer) तर दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची (Suspension) कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी बारा तासांच्या आत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत, असा दावा पोलिसांनी केला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील (Deputy Inspector General of Police Sandeep Patil) यांनी माहिती दिली. (Maharashtra Gang Rape Case)

 

संदीप पाटील यांनी सांगितले की, ही घटना घडल्यानंतर भंडारा पोलिसांनी मुख्य आरोपींवर बारा तासांच्या आत कारवाई केली. यामध्ये एक मुद्दा समोर आला आहे की, रात्री पीडित महिला लाखणी पोलीस स्टेशनमध्ये (Lakhani Police Station) आली होती. त्यावेळी नेमकं काय झाल ? याची चौकशी भंडारा जिल्हा पोलीस प्रमुखांनी केली आहे. आज त्या अहवालानुसार एक पोलीस अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र यामध्ये त्यांची चूक काय होती याचा अहवाल आल्यानंतर समजेल, असे संदीप पाटील यांनी सांगितले. (Maharashtra Gang Rape Case)

 

रुपाली चाकणकर यांनी सांगितले…

भंडाऱ्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणी (Bhandara Gang Rape Case) तीन पोलिसांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या (State Commission for Women) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली.
पहिल्यांदा अत्याचार घडल्यानंतर महिला पोलीस ठाण्यात गेली होती.
पण त्यावेळी पोलिसांनी याप्रकरणाकडे दुर्लक्ष केलं. म्हणूनच दुसरी घटना घडली.
महिला पोलीस स्थानकातून पडतानाचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेलं आहे.
त्यामुळे पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
या प्रकरणात मनोधैर्य योजनेच्या माध्यामातून आपण पीडितेला मदत देतोय असेही चाकणकर यांनी सांगितले.

 

Web Title : – Maharashtra Gang Rape Case | big action in bhandara rape case a police officer two constables suspended

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा