महाराष्ट्र आर्थिक संकटात असतानाच मंत्री अन् त्यांच्या टीमसाठी 1.37 कोटींच्या कार खरेदीस मंजूरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  लॉकडाऊनमुळे राज्य सरकार समोरचं आर्थिक संकट वाढलेलं आहे. राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात काटछाट करावी लागेल, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. मात्र, तरीही शालेय शिक्षण आणि क्रिडा मंत्र्यांच्या विभागासाठी पाच नव्या वाहन खरेदीवर कोटींच्या उधळपट्टीला मंजूरी देण्यात आली आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार, दोन्ही राज्य मंत्री बच्चू कडू आणि अदिती तटकरे यांच्यासह अपर मुख्य सचिव आणि कार्यालयीन कामकाजासाठी प्रत्येकी एक अशा एकूण पाच वाहनांसाठी सुमारे 1 कोटी 37 लाख रुपयांची मंजूरी देण्यात आली आहे. 22 लाख 83 हजार रुपयांची ‘इनोव्हा क्रिस्टा 2.4 ZX’ मॉडेल खरेदी करण्यासाठी वित्त विभागाने मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीने 20 लाखांपेक्षा जास्त किंमत असलेल्या विशेष बाब म्हणून मंजूरी दिली आहे.
खरेदीला मुख्यमंत्र्यांची विशेष परवानगी

एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी मुंबई मध्ये खरेदीला परवानगी देणारा शासकीय प्रस्ताव जारी केला आहे. रिपोर्टनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या खरेदीसाठी खास परवानगी दिली आहे कारण सध्या एकूण मंजूरी मिळालेल्या 20 लाखांच्या किंमतींची मर्यादा ओलांडली आहे. दरम्यान, सचिव आणि कार्यालयाच्या वापरासाठी वाहनांसाठी अपवादात्मक परिस्थितीत मंजूरी देणे हे चुकीचे असल्याचे वित्त विभागात कार्यरत असणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

4 महिन्यात राज्याचे 50 हजार कोटीचे नुकसान

कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यांत आर्थिक व्यवहार बंद आहेत. यामुळे आतापर्यंत महाराष्ट्राला 50 हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like