राष्ट्रवादीच्या ‘या’ लेडी ‘डॉन’मुळं भाजपचं मिशन ‘लोटस’ भरकटलं !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाले. मात्र त्या आधी राज्याला खूप मोठ्या गोंधळाच्या नाट्याला सामोरे जावे लागले. अखेर महाविकासआघाडी झाली आणि उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व करत शिवतिर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करत रातोरात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे दहा – अकरा आमदार उपस्थित होते. भाजपला अपेक्षा होती की अजित पवार हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील आणखी आमदारांचा पाठींबा मिळवतील. शपथ विधी नंतर राष्ट्रवादीचे अनेक आमदार गायब होते. नंतर ते ज्यावेळी आले त्यावेळी त्यांनी घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला.

बेपत्ता असलेल्या आमदारांपैकी एकाने शरद पवारांना मेसेज पाठवून आपल्याला दिल्लीच्या गुरुग्राम ओबेरॉय हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर हा संदेश तातडीने राष्ट्रवादी युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि विद्यार्थी अध्यक्षा सोनिया दुहन यांना देण्यात आला. धीरज शर्मा हे मूळचे गुरुग्रामचे आणि सोनिया धुहन या हरियाणाच्या. या दोघांनीही आमदारांना शोधण्यासासाठी प्रयत्न सुरु केले.

माहिती मिळवून अखेर धीरज आणि सोनिया ओबेरॉय हॉटेलमध्ये पोहचले. त्यावेळी त्या ठिकाणी १५० लोक आणि त्यात भाजपचे जिल्ह्याध्यक्ष भूपेंद्र चौहान असल्याचे सोनिया यांनी सांगितले. १५० कार्यकर्ते आणि काही पोलीस अधिकारी यांच्या नजरा चुकवून त्यांना राष्ट्रवादीच्या चारही आमदारांना सुखरूप परत न्यायाचे होते. दोघांनीही एक रणनीती आखली. त्यानुसार त्याच हॉटेलमध्ये त्यांनी काही खोल्या बुक केल्या आणि आपले वीस पंचवीस कार्यकर्ते तेथे ठेवले.

आमदारांच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी हॉटेलमधील काही माणसांची मदत घेतली. एका रात्री ९.३० च्या आसपास भाजपचे सर्व कार्यकर्ते जेवणासाठी गेल्याचे लक्षात येताच सोनिया आणि धीरज यांनी गुपचून सगळ्यांच्या नजरा चुकवून मागच्या गेटने आमदारांना एका गाडीत बसवले.

आमदारांना गाडीत बसवताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाहिले होते. पुढे जाऊन सोनिया यांनी पुन्हा एकदा गाडी बदलली आणि आमदारांना थेट शरद पवारांच्या दिल्लीच्या घरी नेले. त्या ठिकाणी जेवण वेगैरे झाल्यानंतर सोनिया आणि धीरज हे आमदारांना घेऊन थेट मुंबईला आले. यावेळी भाजपच्या काही कार्यकर्त्यांशी झटापट झाल्याचेही सोनिया यांनी सांगितले. मात्र मुंबईला येताच शरद पवारांनी पाठीवरून हात फिरवत धीरज शर्मा आणि सोनिया दुहन यांचे कौतुकही केले.

Visit : Policenama.com