ठाकरे सरकारची नवीन योजना, आता मुंबईत मिळणार 30 लाखांत घर, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईमध्ये घर घेणार्‍यांना आता घर घेणे सोपं होणार आहे. कारण ठाकरे सरकारने ही नवी योजना आणली असून आता मुंबईत सुमारे 30 लाखांत घर घेता येणार आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

मुंबईमध्ये जमिनीला आलेला सोन्याचा भाव, बिल्डरांनी वाढवलेल्या घरांच्या किंमती आदींमुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे हक्काच्या घराचे स्वप्न राहणार असे वाटत असतानच मुंबईकरांसाठी ठाकरे सरकारने नवी योजना आणलीय. मुंबईमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गंत गृहनिर्माण योजना तयार केली जाणार आहे. यातून 30 लाखांमध्ये घरे खरेदी करण्याची संधी आता मुंबईकरांना मिळणार आहे.

या गृहनिर्माण योजनेचे भूमिपूजन ऑक्टोबर किंना नोव्हेंबरमध्ये होईल, असे शक्यता वर्तविली जात आहे. जर केंद्र सरकारने वेळेत या योजनेला परवानगी दिली, तर गोरेगावा येथे मुंबईकरांना केवळ 30 लाखांत घर खरेदी करता येणार आहे. केंद्र सरकार ऑगस्ट महिन्यात होणार्‍या बैठकीत या योजनेला मान्यता देईल, अशी आशा बाळगली जात आहे, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

ही जागा खासगी मालकीची आहे आणि तो इको सेन्सेटिव्ह झोन आहे. त्यामुळे मागील बैठकीत सर्व माहिती उपलब्ध नसल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे, असे म्हाडाच्या अधिकार्‍याने सांगितले आहे.

या योजनेअंतर्गंत 15 हजार घरे 3 वर्षात उपलब्ध होणार असून सर्वसामान्य नागरिकांसाठी ही योजना असणार आहे. 300 चौरस फुट घराची जागा असणार आहे, असे म्हाडाचे अधिकारी मिलिंद म्हैसेकर यांनी सांगितले आहे.

घर बांधणीसाठी बिल्डरला फ्लोर स्पेस इंडेक्सला 2.5 मध्ये परवानगी देण्यात येणार आहे. यात 50 टक्के भाग हा 1500 इडब्लूएस युनिटमध्ये प्रकल्पाला असणार आहे. तर उर्वरित रक्कम खुल्या बाजारात विक्रीसाठी असणार आहे. सरकारने या योजनेस परवानगी दिल्यास 50-50 अशी सार्वजनिक- खासगी भागीदारी होऊ शकणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या योजनेची घोषणा ट्विट व्दारे केली आहे.