विधानसभेत ‘शपथविधी’ला ‘हे’ 2 दिग्गज आमदार अनुपस्थित, जाणून घ्या कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज विधानसभेत आमदारांचा शपथविधी समांरभ पार पडला. विधानसभा हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या 288 पैकी 286 सदस्यांना दुपारी 1 वाजेपर्यंत शपथ दिली. परंतू या शपथविधीला 2 आमदार मात्र अनुपस्थित राहिले.

भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार हे आमदार आज शपथविधीला अनुस्थित असल्याने त्यांचा शपथविधी आज होऊ शकला नाही. आज विधानसभेच्या निवडणून आलेल्या सदस्यांना शपथविधीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेची बैठक अभिनिमंत्रित केली होती. बैठकीचा प्रारंभ वंदे मातरम् ने तर राष्ट्रगीताने समारोप झाला. परंतू सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहू शकले नाहीत. सुधीर मुनगंटीवार यांच्या मुलीचं लग्न येत्या 1 डिसेंबरला आहे. त्यामुळे लग्नाच्या धावपळीत आज ते मुंबईला येऊ शकले नाहीत. तर देवेंद्र भुयार यांना विधानसभेच्या भवनात पोहचायला उशीर झाल्याने त्यांचा सभागृहात शपथविधी झाला नाही. या कारणाने आता त्यांना विधानसभा अध्यक्षांच्या दालनात शपथ घ्यावी लागणार आहे.

या दरम्यान आज नवनिर्वाचित आमदार पहिल्यांदाच सभागृहात आले होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी या सर्व आमदारांचे हसतमुखाने स्वागत केले. उद्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या नेतृत्वात लवकरच राज्यात सरकार स्थापन होणार आहे.

आज तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदाराकीची शपथ घेतली. यावेळी आदित्य ठाकरे, रोहित पवार, ऋतुराज पाटील, धीरज देशमुख यांच्या सारख्या अनेक नवख्या आमदारांनी शपथ घेतली.

Visit : Policenama.com