आपलेच उपमुख्यमंत्री अजित पवारांना एकेकाळी तुरूंगात पाठवण्याची होती भाजपची इच्छा ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अजित पवारांना जेलमध्ये डांबण्याचे बोलत होते फडणवीस, आता बनवले दोघांनी मिळून बनवले सरकार, चालू आहेत इतके केस महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अजित पवार यांनी शरद पवारांच्या विरुद्ध बंद पुकारले आणि बीजेपी सोबत जाण्याचा निर्णय घेऊन सत्ता स्थापन केली. पण आत्ताच फ्लोर टेस्ट उत्तीर्ण करणे हे भाजपसमोर आव्हान आहे.

या दरम्यान चर्चेचा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अजित पवार यांना जेल मध्ये टाकण्याचे बोलत होत आणि आत्ता त्याच अजित पवारांना उराशी धरून उपमुख्यमंत्री बनवले. तर मग त्यांच्यावरील असणाऱ्या आरोपांचा काय होणार अशी देखील चर्चा ऐकण्यास येत आहे.

खरंतर अजित पवार यांच्यावर खूप असे आरोप आहेत जे की त्यांचा पाठलाग सोडत नाहीत. यापैकी सगळ्यात मोठा आणि चर्चेचा घोटाळा म्हणजे ‘सिंचन घोटाळा.’ बीजेपी ने वेळोवेळी सिंचन घोट्याळ्याप्रकरणी अजित पवारांना धारेवर धरले आहे. अजित पवार यांवर कोणकोणते आरोप आणि केस दाखल आहेत ते बघूया…

२०१० साली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार स्थापन झाले होते आणि त्यामध्ये अजित पवारांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर २ वर्षांनी त्यांना घोटाळा करण्याच्या आरोपावरून उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. २०१८ मध्ये महाराष्ट्र एंटी करप्शन ब्यूरो कडून अजित पवारांना ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोपी ठरवले होते.

बँक डायरेक्टर असताना झाला होता आरोप
अजित पवार महाराष्ट्र कोऑपरेटिव बँकेचे डायरेक्टर असताना त्यांच्यावर आरोप होता की, बँकेने अनेक साखर कारखान्यांना कमी दरात कर्ज दिले होते. नंतर गिरण्यांनी स्वतःला दिवाळखोर घोषित केले.

तसेच मालमत्तांची विक्री करणे, स्वस्त कर्जे देणे आणि ते परत न भरल्यामुळे 2007 ते 2011 दरम्यान बँकेला सुमारे 25 हजार कोटींचे नुकसान झाले असा आरोप आहे.

अजित पवारांवर खालील खटले चालू आहेत…

कलम ४०६ नुसार, विश्वासाचा गुन्हेगारीचा भंग

कलम ४०९ नुसार, फसवणूक करणारा व्यावसायिका

कलम ४२० नुसार, फसवणूक आणि बेईमानी

कलम ४६५ नुसार, फसवणूक

कलम ४६७ नुसार, मोठ्या पैशासाठी फसवणूक

देवेंद्र फडणवीस सहित बीजेपीच्या सर्व नेत्यांनी आपल्या भरसभेत सगळ्यांसमोर अजित पवार यांना जेल मध्ये पाठविण्याची भाषा करत होते. परंतु आता सत्तेसाठी सगळं विसरून एकत्रित सरकार बनविले आहे.

Visit : Policenama.com