राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या ‘मनधरणी’चे प्रयत्न, जयंत पाटलांसह दिलीप वळसे-पाटलांनी घेतली भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून संयुक्त पद्धतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आलेली आहे. त्यावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवारांची मनधरणी करण्याचा राष्ट्रवादींच्या नेत्यांकडून वारंवार प्रयत्न केला जात आहे. अजित पवारांनी चूक मान्य करावी आणि पक्षात परत यावे असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले आहे तर जयंत पाटील यांनी स्वतः अजित पवारांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते.

तत्पूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांना गटनेते पदावरून हटवल्याचे पत्र राजभवनावर जाऊन राज्यपालांच्या कार्यालयात सुपूर्त केले होते. भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पवारांची भेट घेतली असून, वैयक्तिक कामासाठी त्यांना भेटल्याचं सांगितलं आहे. तर अशोक चव्हाणही सिल्वर ओक बंगल्यात दाखल झाले आहेत. सर्वच पक्ष आपले आमदार फुटू नहेत यासाठी प्रयत्नशील झाल्याचे समजते.

अजित पवारांना समर्थन दिलेले आमदार काल संध्याकाळी राष्ट्रवादीच्या बैठकीला पोहोचले होते. त्या सर्वच आमदारांनी शरद पवारांवर विश्वास व्यक्त केला आहे. परंतु त्यातील पाच आमदार गायब असल्याचं नंतर नवाब मलिक म्हणाले होते.

काल सकाळी शरद पवारांनी फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीची बातमी समजल्यानंतर सर्वात आधी उद्धव ठाकरे यांना फोन करून ‘काळजी करू नका, मी सोबत आहे’ असा धीर दिला. तसेच सेनेचे आमदार सांभाळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी काही ज्येष्ठ विधिज्ञांशी सल्लामसलत केली. तसेच तीनही पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने उद्या पुन्हा सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

Visit : Policenama.com