विधानसभेत अजित पवारांची झाली ‘गल्लत’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : राज्यात उद्धव ठाकरे सरकारने शनिवारी बहुमत चाचणी सिद्ध केली. त्यानंतर आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष म्हणून नाना पटोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांचे मुख्यमंत्री आणि इतर सर्व नेत्यांनी अभिनंदन केले. यावेळी नाना पटोले यांच्या अभिनंदन प्रस्तावावर गटनेते व इतर नेत्यांनी भाषणं केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
Maharashtra Government: And when NCP leader Ajit Pawar misses the assembly ... | Maharashtra Government: अन् राष्ट्रवादी नेते अजित पवार विधानसभेत चुकतात तेव्हा...
नाना पटोले यांना अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले की, विधानसभेत अनेक सदस्य नव्याने निवडून आले आहेत, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य मिळालं पाहिजे, अध्यक्ष म्हणून तुम्ही या पदाला न्याय द्याल ही अपेक्षा आहे. विदर्भाचे सुपुत्र या सभागृहाच्या अध्यक्षपदी बसले आहेत ही एक मोठी बाब असून त्याचा आनंद सगळ्यांनाच आहे. तसेच अजित पवार म्हटले की, विदर्भाचे प्रश्न सुटले पाहिजेत तसेच कोकण, मराठवाडा, चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका असली पाहिजे असं त्यांनी सांगितले.

काँग्रेस बाळासाहेब थोरात यांनी भाषणात सांगितलं की मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असताना या नावाचा सर्वात आधी विचार केला होता. यावर अजितदादांनी भाष्य करत काहीकाही लोकांनी विधिमंडळ नेते म्हणून तोडीचं काम केले आहे. एकप्रकारे त्यांचा अपमान झाल्यासारखंच आहे. एखाद्या भगिनीला अध्यक्षपद मिळालं असतं तर आनंद झाला असता असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सभागृहाची उंची वाढविण्याचं काम नाना पटोले यांच्याकडून होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘प्रतिभा पाटील यांच्या रुपाने लोकसभेला सभापती मिळाल्या’ असा उल्लेख अजित पवारांनी केला मात्र इतर सदस्यांनी लगेचच ही चूक अजितदादांना लक्षात आणून देताच त्यांनी राष्ट्रपती असा उल्लेख केला.

शनिवारी विधानसभेत बहुमत चाचणी सिद्ध करताना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून आकडे सांगून मतमोजणी करण्यात आली. त्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून १६ ऐवजी २० असा आकडा सांगण्यात आला त्यावेळी अजित पवार, हसन मुश्रीफ यांनी आव्हाडांना आपली चूक लक्षात आणून दिली.

Visit : Policenama.com