भाजपच्या आक्रमक पवित्र्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांसोबत ‘हस्तांदोलन’ करत मारली ‘मिठी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील अनेक दिवसांचा राज्यातला राजकीय पेच अखेर संपुष्टात आला आहे. विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारनं बहुमत सिद्ध केलं. बहुमत सिद्ध करत असताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्रिक कारणं देत उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. विधानसभेत येण्याचा हा उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दिवस होता. तीन दशकांपासून असलेला मित्रपक्ष भाजप हा विरोधी पक्षात होता आणि ज्याच्यासोबत आयुष्यभर संघर्ष केला ते पक्ष सोबत होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं. यावेळी त्यांची राहुल गांधी स्टाईल सभागृहात बघायला मिळाली आणि जोरदार चर्चाही रंगली.

विधानसभेत पहिल्यांदाच आलेले उद्धव ठाकरे भाजप विरोधात आक्रमक पवित्रा घेणार असल्याची सगळ्यांनाच कल्पना होती. पण उद्धव ठाकरे कुठेही तोल ढळू न देता विधानसभेत थेट विरोधी बाकावर बसलेले देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याशी हस्तालोंदन करत त्यांना मिठी मारली. तसेच त्यांच्या खांद्यावरही हाथ ठेवला त्यामुळे विधानसबेत उपस्थित असलेल्या आमदारांच्या भुवया उंचावल्या. उद्धव ठाकरे यांच्या कृतीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावर होत आहे. त्यांची राहुल गांधी स्टाईल सभागृहात गाजली. लोकसभेत एकदा अनपेक्षितपणे राहुल गांधी भाषणानंतर मोदींच्या आसनाजवळ जात त्यांची गळाभेट घेतली होती. त्यामुळे ते चर्चेचा विषय ठरले होते. त्याच पर्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या गळाभेटीची चर्चा होत आहे.

विश्वासदर्शक ठराव झाल्यावर केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, शिवरायांच्या राज्यातील जनतेने विश्वास टाकला त्याबद्दल त्यांचे आभार. पहिल्यानंदा सभागृहात आलो आहे. हे राज्य शिवरायांचं आहे. सभागृहात येण्यापूर्वी दडपण होतं. पण इथं आल्यानंतर ते कमी झालं. मी शत्रूला अंगावर घेणारा आहे, पण सभागृहातले विरोधक हे शत्रू नाही.

Visit : Policenama.com