‘महाशिवआघाडीला’ काँग्रेस नेत्यांचा ‘विरोध’, ‘महाविकासआघाडी’साठी आग्रही !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसकडून अनुमती देण्यात आल्याचे कळते आहे. दिल्लीत गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली. त्यामुळे शिवसेनेसोबत जाण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. परंतू महाशिवआघाडीला काँग्रेसचा विरोध असल्याचे कळते आहे. तर काँग्रेस महाविकासआघाडीसाठी आग्रही आहे. परंतू यावर शिवसेनेकडून प्रतिक्रिया आलेली नाही.

राज्यात सत्तास्थापनेला वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेगवेगळ्या आणि संयुक्त बैठका दिल्लीत सुरु आहे. दरम्यान या तिन्ही पक्षांच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची देखील माहिती आहे. महाविकासआघाडीबाबात सर्वकाही सकारात्मक सुरु असल्याचे चित्र आहे.

संभाव्य मंत्र्यांची यादी देखील तयार झाल्याचे वृत्त आहे, त्यानुसार मंत्रिमंडळात राष्ट्रवादीकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, नवाब मलिक आणि धनंजय मुंडे यांचा सहभाग असेल अशी शक्यता आहे. या ज्येष्ठ नेत्यांसह मंत्रिमंडळात नव्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादीचे एकूण 15 मंत्री असतील अशी माहिती आहे. या सगळ्या नावांबद्दल आता शरद पवार यांच्या निवासस्थानी खलबते सुरु आहेत. या चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल.

राज्यात निकाल लागले तेव्हा चित्र उघड झाले की कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे महाशिवआघाडीची गणितं आता जुळताना दिसत असली तरी हे स्पष्ट आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जागांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी मागणी होऊ शकते. 50 – 50 च्या फॉर्म्युल्यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की मुख्यमंत्रिपदाची पहिली टर्म शिवसेनेला मिळेल अशी चर्चा बैठकीत झाली आहे. त्यामुळे ही शक्यता बळावली आहे की दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाईल. तसे तर शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदासाठी 3 नेत्यांची नावे आघाडीवर आहेत तर राष्ट्रवादीतून एका नेत्याचे नाव आघाडीवर आहे.

Visit : Policenama.com