‘संजय राऊत गल्लीतल्या कुजक्या म्हाताऱ्यासारखा’ : निलेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना व संजय राऊत यांच्यावर टीका करण्याची एकही संधी नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे सोडत नाहीत. संजय राऊत गल्लीतल्या कुजक्या म्हाताऱ्यासारखा असे म्हणत निलेश राणे यांनी ट्विटरवरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत मीटिंग करायची यांनी. एनडीएची मीटिंग शिवसेनेने नाकारली, पण संज्या राऊत गल्लीतल्या त्या कुजक्या म्हाताऱ्यासारखा आहे जो सगळं ठीक असेल तरी सोसायटीच्या वॉचमनशी उगाच हुज्जत घालतो’.

विधानसभा निवडणुकीचा निकाल घोषित जाहीर झाल्यापासून निलेश राणे यांनी शिवसेनेसह शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही ट्विटच्या माध्यमातून सातत्याने जोरदार टीका करत आहेत. अतिहुशारी दाखवून तोंडावर आपटल्यामुळेच संजय राऊत आडवे झाले असल्याची टीका निलेश राणे यांनी यापूर्वी केली होती. ते स्वत: चालत हॉस्पीटलमध्ये गेले आणि काही तासातच सगळी ऑपरेशनही करून झाली. लोकं मूर्ख नाहीत, अशा आशयाचं ट्विट निलेश राणे यांनी केलं होतं.

Visit : Policenama.com