Maharashtra Unlock : राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक, 18 जिल्हे पूर्णपणे Unlock; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले निर्बंध हटवण्याचा निर्णय (Decision) घेण्यात आला आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने हा निर्णय (Decision) घेण्यात आला आहे. राज्यात एकूण पाच टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांत सर्व सेवा, सुविधा सुरु होणार आहेत. याची अंमलबजावणी शुक्रवार (दि.4) पासून केली जाणार आहे.

50 हजाराची लाच घेताना उत्पादन शुल्कचा निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

लोकल सेवा बंदच
पहिल्या टप्प्यात एकूण 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जिल्हे दुसऱ्या टप्प्यात आहेत. त्यामुळे या ठिकाणी लोकल सेवा तुर्तास सर्वसामान्यांसाठी बंदच राहणार आहे.

पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे
दुसऱ्या टप्प्यात 5 जिल्हे
तिसऱ्या टप्प्यात 10 जिल्हे
चौथ्या टप्प्यात 2 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केला जाणार आहेत.

या प्रमाणे असतील 5 टप्पे
पहिला टप्पा –
5 टक्के पॉझिटीव्हिटी रेट आणि ऑक्सिजन 25 टक्के बेड आत आहे. त्याठिकाणी लॉकडाऊन राहणार नाही. मॉल्स हॉटेल्स, दुकाने वेळेचे बंधन नाही. पहिल्या टप्प्यात क्रिडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालये पूर्ण सुरु होतील, चित्रपट गृह सुरु होतील.

पहिल्या टप्प्यातील जिल्हे
भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ

दुसरा टप्पा – दुसऱ्या टप्प्यात एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, अहमदनगर, अमरावती, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील या जिल्ह्यांत काही निर्बंध अंशत: शिथिल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

तिसरा टप्पा – तिसऱ्या टप्प्यात राज्यातील एकूण 10 जिल्ह्यांचा समावेश आहे.

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे