राज्य शासनाचा निर्णय ! राज्यात 15 एप्रिलपर्यंत Lockdown वाढवला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने लॉकडाऊन १५ एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची मार्गदर्शक सूचना आज (शनिवारी) राज्य शासनाने जारी केली आहे.

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनामुळे राज्य सरकारने नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तर आज रात्री ८ वाजल्यापासून ते पहाटे ७ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच चौपाट्या, उद्याने, मॉल, सिनेमागृह यासाठीही राज्य सरकारने अनेक निर्बंध घातले असून सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात मिशन बिगिन अगेन (Mission Begin Again) द्वारे अनेक निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वेळोवेळी त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र, राज्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आणखी काही निर्बंध कडक करण्यात आले आहेत. तर, राज्यात २८ मार्चपासून रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळं राज्य सरकारने लॉकडाउन बाबत नव्याने मार्गदर्शक सूचनां जारी केल्या आहेत.