राज्यातील Lockdown 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवला

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाचा (Covid-19) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन (Lockdown) आता 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आला आहे.

राज्यात हळूहळू सर्वकाही सुरू केलं जात आहे. असं असलं तरी कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. कोरोना संक्रमणा घट मात्र होताना दिसत आहे. कोरोनामुक्तांची संख्याही वाढत आहे. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट येऊन परिस्थिती आणखी बिघडू नये यासाठी लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

अलीकडेच केंद्र सरकारनं (Central government) अनलॉक 5.0 (Unlock 5.0) ची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवली आहे. त्यामुळं आता सध्या जी काही बंधनं आहेत तीच पुढील महिनाभर कायम राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं (Central home ministry) सांगितलं आहे की, कोरोनाची साथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळं सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. याशिवाय प्रतिबंधित क्षेत्रात कडक लॉकडाऊन (LockDown) सुरूच राहणार आहे असंही केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. यानंतर आता राज्यातील लॉकडाऊन देखील वाढवण्यात आला आहे.

गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून भारत कोरोनाशी निकराची झुंज देत आहे. 22 मार्च पासून पहिल्यांदाच देशाचा मृत्यूदर निच्चांकी पातळीवर आला आहे. त्यामुळं आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाली आहे.