सत्तास्थापनेचे डील फायनल ! शिवसेनेला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा ?

नवी दिल्ली : वृत्तसस्था – मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेत फुट पडल्यानंतर पंधरा दिवस घडलेल्या अनेक घडामोडीनंतर अखेर राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने सत्तास्थापनेत असमर्थता दाखवल्यानंतर शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देण्यात आले. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तास्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेस शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्याची शक्यता दिसुन येत आहे.

राज्यात शिवसेनेची सत्तास्थापन होऊ शकते. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली स्थापन होत असलेल्या सरकारला काँग्रेस बाहेरून पाठिंबा देत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे सरकार स्थापन होउ शकते. निवडणुकीत विरोधात लढलेल्या तिन पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असले तरी काँग्रेसने मात्र बाहेरुन पाठिंबा देणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्याशी फोनवर चर्चा केली.

Visit : Policenama.com