युतीचा ‘संसार’ कधीपर्यंत चालणार, आज संध्याकाळपर्यंत होणार निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने सत्ता स्थापनेसाठी नकार दिल्याने राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले त्यानंतर शिवसेनेच्या गोटातून हालचालींना मोठा वेग आला होता.

काँग्रेस आज चार संध्याकाळपर्यंत आपला निर्णय जाहीर करणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा यानंतरच आपला सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय जाहीर करणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी आम्ही पर्यायी सरकारबाबत शिवसेनेशी चर्चा करत असल्याचे देखील स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात नेमकं कोण सत्ता स्थापन करणार याबाबतचा निर्णय संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.

तत्पूर्वी जास्त संख्याबळ असलेल्या भाजपने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भाजपने शिवसेनेने आपल्याला साथ न दिल्याने हा निर्णय घेत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शिवसेनेच्या गोटात सत्ता स्थापनेच्या हालचालींना मोठा वेग आला होता.

राज्यात जनतेने कोणत्याच पक्षाला बहुमत न दिल्याने कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही अशात शिवसेनेने भाजपला युतीसाठी साथ न दिल्याने भाजपने विरोधात बसण्याचा निर्णय जाहीर केला होता अशात आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com