राष्ट्रवादीची ‘डोकेदुखी’ वाढली, मंत्रिपदासाठी नेत्यांमध्ये रस्सीखेच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हात मिळवणी करत शिवसेनेने राज्यात सरकार स्थापन केले. आपल्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभाग स्वीकारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कामालादेखील लागले. मात्र उद्धव ठाकरेंच्या शपथ विधीनंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नेत्यांना मंत्री पदाचे वेध लागले आहेत. यामुळे मात्र राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलहाला सुरुवात झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता नेत्यांमध्ये देखील मंत्री पदाबाबत स्पर्धा झाल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री पदासोबत गृहमंत्रीपद हवे आहे. त्यासाठी अजित पवारांचे नाव चर्चेत आहे मात्र त्यांना अजून मंत्री मंडळात स्थान मिळालेली नाही. त्यामुळे अजित पवारांची नाराजीचा भर पडली आहे. तसेच याबाबत मोठी स्पर्धा सुरु झाली असून त्यामुळे आता ही दोनीही महत्वाची खाती विधिमंडळ नेते जयंत पाटील यांच्याकडे जाणार असल्याचं बोललं जात आहे.

ओबीसी चेहरा असलेले छगन भुजबळ यांच्यावर अनेक आरोप असूनबी देखील त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे कारण उद्धव ठाकरे यांच्यानंतर त्यांनी देखील शपथ घेतली होती. मात्र त्यानंतर असलेल्या नेत्यांपैकी जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे यांच्या देखील मंत्री पदावरून रस्सी खेच सुरु असल्याचे बोलले जात आहे.

गृहमंत्रीपद आणि महत्वाची खाती आपल्या जवळच्या व्यक्तीकडे ठेवण्याचा शरद पवारांचा प्रयत्न असणार आहे. राष्ट्रवादीत अंतर्गत कलह वाढू नहे यासाठी हिवाळी अधिवेशनानंतर मंत्री मंडळ विस्तार व्हावा यासाठी अनेक जेष्ठ नेते आग्रही आहेत.

शिवसेनेतील नेते मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालय आमच्याकडेच राहील असा दावा करत आहेत त्यामुळे आता गृहमंत्रालयावरून महाविकास आघाडीत गृहकलह वाढवेल की काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचा अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार हवा आहे. परंतु राष्ट्रवादीकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे हा विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर देखील होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Visit : Policenama.com